Diwali Nibandh in Marathi – दिवाळी निबंध मराठी

Diwali Festival Essay in Marathi

(दिवाळी निबंध मराठी – Diwali Essay in Marathi – Diwali Festival Essay in Marathi – Diwali Nibandh in Marathi – Short Diwali Essay in Marathi – Diwali Information in Marathi Essay) 

मित्रांनो दिवाळी हा भारतीयांचा मुख्य सण आहे आणि तो भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे, ज्याच्या आगमनामुळे आपल्या समाजातील विविध स्तरातील लोक एकत्र येत असल्याने सणाचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व वाढते.

आजच्या लेखाद्वारे आम्ही तुमच्यासोबत विविध शब्द मर्यादांमध्ये “दिवाळी निबंध मराठी (Diwali Essay in Marathi)” शेअर करत आहोत.

Diwali Festival Essay in Marathi – (10 lines) दिवाळी वर मराठी निबंध

10 Lines on Diwali Festival Essay in Marathi

  1. दिवाळी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, ज्याला “दीपावली” असेही म्हणतात.
  2. दिवाळी हा हिंदू संस्कृतीला आधार देणारा महत्त्वाचा सण आहे.
  3. दिवाळी हा आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुध्द द्वितीयेपर्यंत पाच दिवसांचा सण असतो.
  4. दिवाळीच्या सणातल्या पाच दिवसांत प्रत्येक घरी कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास केली जाते.
  5. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची परंपरा असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.
  6. दिवाळीच्या दिवशी घरासमोर सुंदर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात.
  7. फटाक्यांबरोबरच मुलांना दिवाळीत नवीन आणि छान कपडे आणि विविध खेळणीही मिळतात.
  8. दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला जातो आणि इतरांनाही शेअर केला जातो.
  9. दिवाळीच्या काळात घर, कार्यालय, कारखाने सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
  10. दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो त्यामुळे सर्वत्र एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
Diwali Festival Essay in Marathi
Diwali Festival Essay in Marathi

Short Essay On Diwali In Marathi – (200 शब्द ) दिवाळी निबंध मराठी

दिवाळी हा हिंदूंचा अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण आहे. दिवाळी हा आपल्या भारतात साजरा होणारा सर्वात मोठा सण आहे. तसे, आपल्या भारतात अनेक सण साजरे केले जातात. पण दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. 

त्रेतायुगात 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान श्री राम अयोध्येत परतल्याचा आनंदोत्सव साजरा करताना अयोध्येत सर्वत्र दिवे लावण्यात आले होते, त्यामुळे संपूर्ण अयोध्या स्वर्गासारखी उजळून निघाली होती. भगवान रामाच्या अयोध्येत आगमन झाल्याबद्दल दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळी सण हा 5 दिवसांचा सण आहे. वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत हा सण साजरा केला जातो. या उत्सवातील महत्त्वाच्या दिवसांमध्ये वसु-बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज यांचा समावेश होतो. दिवाळी हा सण प्रामुख्याने उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

दसऱ्यानंतर 20 दिवसांनी दिवाळी येते. दसऱ्यानंतर प्रत्येक घरात दिवाळीची तयारी सुरू होते. घराची डाग-डुजी करणे, साफसफाई करणे, रंगकाम करणे, नवीन कपडे खरेदी करणे, विविध प्रकारची मिठाई घरा-घरामध्ये बनवली जाते. 

सर्वत्र दिवे आणि आकाश कंदील लावले जातात, प्रवेशद्वारावर, अंगणात रांगोळ्या काढल्या जातात, फटाके फोडले जातात आणि स्वादिष्ट फराळाचा आस्वादही घेतला जातो.

दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधलेले जातात. नवीन कपडे घालून फटाके फोडण्याचा आनंद घेतल्या जातो. दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांकडे जातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात, मिठाई देतात. अशा प्रकारे दिवाळी हा एक आनंदाचा सण आहे जो आपल्या जीवनात आनंद, प्रेम आणि बंधुभाव पसरवतो.

Essay On Diwali In Marathi – (500 शब्द ) दिवाळी वर मराठी निबंध

दिवाळीचे दुसरे नाव ‘दीपावली’ आहे. या सणाचा अर्थ ‘दीपोत्सव’ किंवा ‘प्रकाशोत्सव’ असा आहे. दीपोत्सवात घरांच्या अंगणात अगणित दिवे लावले जातात. दिव्यांच्या या असंख्य रांगा आकाशातील ताऱ्यांसारख्या दिसतात.

दिवाळी सणासुदीचे दिवे सुंदर, रंगीबेरंगी आणि निसर्गाचे प्रतिनिधित्व करतात. दिव्यांच्या या तारांमुळे रात्रीच्या अंधारात घरे अधिक सुंदर दिसतात. लोकांच्या घरांचे अंगण जणू दिव्यांच्या ओळीने सजले जातात. या ओळी एक चैतन्यशील वातावरण तयार करतात जे प्रत्येकाला हवेहवेसे वाटते.

या उत्सवाची सुरवात ‘वसुबारस’ पासून होते आणि ‘भाऊबीज’ साजरा केल्यानंतर, दिवाळीची सांगता होते. दिवाळी हा सर्व वयोमान्य, मुले, स्त्री-पुरुषांच्या हृदयातील प्रेमाचा सण आहे. दिवाळी मुळे प्रत्येक घराला एक अनोखे रूप आणि अनुभव येते. हा सण नवीन कपडे, दागिने आणि सामान्य घरगुती वस्तू खरेदी करण्याची संधी आहे. याबरोबरच फटाक्यांची आतिशबाजी आणि विविध दिवाळी फराळाच्या स्वादाची अनोखी भरपूर अनुभवायला मिळते.

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपली प्राचीन संस्कृती आपल्याला सर्व प्राण्यांशी प्रेमाने वागण्याची शिकवण देते. या शिकवणीनुसार वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यांना गोड खाद्य पदार्थ दिले जाते. गायीपासून आपल्याला दूध व इतर फायदे मिळतात आणि शेतीसाठी बैलांची मदत महत्त्वाची आहे. या गोष्टी लक्षात ठेवून गोधनाची कृतज्ञतापूर्वक पूजा केली जाते.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यांचा विशेष मान असतो. ह्या दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा दिवाळीचा मुख्य पहिला दिवस आहे. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे, नवीन वस्त्रे परिधान करायची, देवदर्शन करायचे, आणि सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी फराळ करून ह्या दिवसाचा आनंद साजरा करायचा असतो.

ह्या दिवसाची एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे, या कथेअनुसर भगवान श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली होती तो हा दिवस. दुष्टांचा नाश आणि सुटकेचा आनंद ही या दिवसातील एक महत्त्वाची घटना आहे आणि याचे कारण म्हणजे या दिवसामागचा आनंद साजरा करण्यासाठी ही कथा सांगितली जाते.

अश्विन महिन्याचे शेवटचे दोन दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले दोन दिवस – या चार दिवसांच्या मुख्य दिवाळीच्या अवसरी, आपल्याला विशेषपणे आकर्षक आणि महत्त्वपूर्ण कामांसाठी सजवायला मिळतात. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी, घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, आणि ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरोघरी सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा केली जाते. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतात. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनानंतर, आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) ह्या देवीची पण पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या नंतर, फटाक्यांची आतिशबाजी केल्यानंतर, त्या दिवसाच्या आनंदाच्या घडणारांमध्ये आपल्याला सहभागी व्हायला मिळतो.

या नंतर पाडवा, असा एक दिवस आहे जो बलिप्रतिपदा आणि साडेतीन मुहुर्तांच्या एक मुहुर्तातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी, अनेक नवे प्रकल्प सुरू केले जातात. पाडव्याच्या दिवशी, पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून विविध वस्तू, दागिने, किंवा साडी उपहार देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच “यमद्वितीया” किंवा “भाऊबीज” असे म्हणतात. बहीण आणि भाऊ यांच्यातील उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहीण भावाला आंघोळ घालते, गोड अन्न अर्पण करते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू ओवाळणी घालतो.

दिवाळीच्या सणातला लहान मुला-मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला बनवणे, त्यावर चित्रे मांडणे, फटाके उडवणे आणि सुट्यांचा आनंद घेणे असा आणि स्त्रियांसाठी संध्याकाळी दारापुढे छान रांगोळ्या काढणे आणि स्वादिष्ट व्यंजन तयार करणे, ह्या सणाच्या विशेष आनंदाच्या घडणारांमध्ये एक आहे.

एकमेकांना भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड्स वगैरे देऊन आनंद साजरा केला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश आणणारी ही दिवाळी सर्वांना प्रिय आहे. जो तो त्याच्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो आणि आनंद घेतो. दिवाळी म्हणजे अमर्याद आनंद, दिवाळीच्या अनेक सुखद आठवणी मनात अनेक दिवस रेंगाळत राहतात.

———————————————-//

अन्य लेख पढ़ें: